Sarnobat : 'सरनोबत' (Sarnobat) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरनोबत' अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीरांच्या गाथेला उजाळा देण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात येणार आहे. 


'सरनोबत' अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात हा भव्यदिव्य सिनेमा मराठीसह हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. दिपक कदम यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाद्वारे दिग्दर्शक दिपक कदम बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. 


'सरनोबत' सिनेमासंदर्भात दिग्दर्शक दिपक कदम म्हणाले, 'सरनोबत' म्हणजेच प्रतापराव गुजर, आपण लहानपणापासून एक गाणं ऐकतोय, 'म्यांनातून उसळे तलवारीची पात। वेडात मराठे वीर दौडले सात', पण हे सात मराठा वीर कोण आणि ते का दौडले आणि त्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा घेणारा हा सिनेमा आहे. 


दिपक कदम पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी  अशा धैर्यशील माणसांची फौज तयार केली होती जी माणसे स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती द्यायला तत्पर असत, केवढी ही स्वामी निष्ठा आणि केवढे ते स्वराज्य प्रेम, अशा स्वराज्य प्रेमाने बेभान झालेले त्यातलेच एक प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार यांच्या पराक्रमाची गाथा म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले सात अर्थात सरनोबत. हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 


मोशन पोस्टर पाहा :


 


संबंधित बातम्या


OTT Release : प्रतीक्षा संपली! ओटीटीवर रिलीज होणार 'हे' बिग बजेट दाक्षिणात्य सिनेमे


30 Years of Akshay Kumar: अक्षय कुमारने चित्रपटसृष्टीत पूर्ण केली 30 वर्षे, 'पृथ्वीराज'चं नवं पोस्टर रिलीज


Hariom : नवयुगातील मावळे; 'हरिओम' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Jagdish Chauhan : 'इंडियन आयडल' फेम जगदीश चौहान 'विजयी भव'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका ; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस