OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता दाक्षिणात्य सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. यात एस एस राजामौलींचा 'आरआरआर' (RRR), विजयचा 'बीस्ट' (Beast), 'चिरंजीवी' (Chiranjeevi) आणि राम चरणच्या (Ram Charan) 'आचार्य' (Acharya) सिनेमाचा समावेश आहे. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता हे सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.
बीस्ट (Beast) : 'बीस्ट' (Beast) हा दाक्षिणात्य सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता हा सिनेमा 11 मे ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात पूजा हेगडे आणि विजय मुख्य भूमिकेत आहेत. तर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
आरआरआर (RRR) : आरआरआर (RRR) हा ब्लॉकबस्टर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. राम चरण आणि ज्यूनिअर एनटीआरचा हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा पाच भाषेत झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्वर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 20 मे 2022 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
आचार्य (Acharya) : नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आचार्य (Acharya) सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चिरंजीवी आणि राम चरणचा हा सिनेमा 27 मे 2022 रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
संबंधित बातम्या