Cannes festival 2022 : भारत यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes festival) सहभागी होणार आहे. यंदा 17 मे ते 28 मे या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा सिनेमा यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात 'ऑल दॅट ब्रीथ्स' या सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. तसेच सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा सिनेमादेखील या महोत्सवात दाखवला जाणार आहे. सत्यजित रे यांचा हा सिनेमा बंगाली लेखक सुनील गंगोपाध्याय यांच्या कथेवर आधारित आहे. या सिनेमाने 1971 साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धृतिमान चॅटर्जी यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.
फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांना फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. यंदाचा फिल्म फेस्टिव्हल खास असणार आहे. भारताच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन शौनक सेन यांनी केले आहे.
संबंधित बातम्या