एक्स्प्लोर
कबालीचा भारतासह परदेशातही धुमाकूळ, पहिल्या दिवशीच सर्व रेकॉर्ड मोडीत
मुंबईः रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. कबालीने वर्ल्डवाईड तब्बल 55 कोटींची कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये या सिनेमाने एकाच दिवसात तब्बल 12.93 कोटींची कमाई केली आहे.
परदेशात भारतीय सिनेमाने एवढी कमाई करण्याची पहिलीच वेळ आहे. कबालीने या कमाईसह परदेशात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 'कबाली' भारतातील 12 हजार स्क्रिनवर रिलीज झाला आहे. शिवाय मलेशिया, सिंगापूर, अमेरिका यांसह अनेक देशांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/756509729053106176
'कबाली' कमाईच्या बाबतीत नवीन इतिहास रचेल, असं समीक्षकांचं म्हणणं आहे. जगभरातील ओपनिंग कमाई पाहता सिनेमा विक्रमी कमाईच्या दिशेने असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात 'कबाली' तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.
'कबाली'ची पहिल्या दिवशीची कमाई
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगनाः 35 कोटी
वर्ल्डवाईड कमाईः 12.93 कोटी
एकूण कमाईः 55 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement