एक्स्प्लोर

REVIEW | जंगली - राक्षसी महत्त्वाकांक्षेची 'हस्तीदंती' गोष्ट

जंगली या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माणूस आणि हत्तीचं नातं अधोरेखित होतं आहे. विद्युत जामवाल हा अत्यंत चपळ नट या चित्रपटाचा हिरो असल्यामुळे या सिनेमात हाणामारी असणार यात शंका नाही. पण ही हाणामारी कुतूहल वाढवते कारण यात या नायकाच्या समोर अतुल कुलकर्णी असतो. आपल्या पूजा सावंतचा हा पहिला हिंदी चित्रपट असल्यामुळे या सिनेमाबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतो.

सिनेमात प्राणी वापरायचे असतील तर त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते बोर्डाकडून. त्यासाठी वेगळं बोर्ड नेमलं गेलं आहे. अगदी बेडूक, कोंबडी, बकरी, बैल, कुत्रा असं काहीही सिनेमात वापरायचं असेल तर त्याची परवानगी आणि प्राण्यांची घेतली जाणारी काळजी ही सतत पुरावे म्हणून दाखवावी लागते. आता तुम्ही म्हणाल सिनेमाच्या समीक्षेच्या सुरुवातीला हे कुठं आलं मध्येच. तर हे महत्त्वाचं आहे. कारण जंगली या चक रसेल या अमेरिकन दिग्दर्शकाच्या सिनेमता थेट हत्तीच वापरण्यात आले आहेत. केवळ एक नाही तर निदान 8 हत्ती तरी इथे दिसतात. या सगळ्यांना घेऊन सिनेमा करणं हे खायचं काम नाही. याबद्द्ल त्यांचं आधी अभिनंदन. जंगली या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माणूस आणि हत्तीचं नातं अधोरेखित होतं आहे. विद्युत जामवाल हा अत्यंत चपळ नट या चित्रपटाचा हिरो असल्यामुळे या सिनेमात हाणामारी असणार यात शंका नाही. पण ही हाणामारी कुतूहल वाढवते कारण यात या नायकाच्या समोर अतुल कुलकर्णी असतो. आपल्या पूजा सावंतचा हा पहिला हिंदी चित्रपट असल्यामुळे या सिनेमाबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतो. असो.
हा सिनेमा हत्तींभवती फिरतो. एका अभयारण्यात हत्तींची प्रजाती वाढवण्यासाठी, हत्तींना वाचवण्यासाठी काही लोक काम करत आहेत. त्यापैकी एक आहेत नायकाचे वडील. वडिलांबाबत एक अढी मनात धरुन नायकाने दहा वर्षांपूर्वीच घर सोडलेलं आहे. काही कारणाने नायकाचं या जंगलात परत येणं होतं. तेव्हा त्याचा जीवाभावाचा मित्र हत्ती भोला आता मोठा झाला आहे. कळपाचा राजा झाला आहे. सगळं आनंदी असताना केशव नावाच्या शिकाऱ्याची नजर भोलाच्या दातावर पडते. यातून शिकारी आणि नायक असं युद्ध रंगतं. या युद्धाची गोष्ट म्हणजे जंगली.
सिनेमाची गोष्ट फार महत्त्वाची आहे. सिनेमातलं जंगल, हत्ती, कलादिग्दर्शन, संगीत, संकलन, स्टंट या सगळ्या बाजू नेटक्या आहेत. चक रसेल यांची या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी महत्वाची आहे. म्हणूनच सिनेमाचा पूर्वार्ध देखणा आहे. अडचण आहे ती उत्तरार्धाची. कारण पूर्वार्धात त्यांनी आपल्याला सांगायची ती सगळी गोष्ट सांगून टाकली आहे. मग उत्तरार्धात उरते ती केवळ हाणामारी. म्हणून दोन भागांच्या तुलनेत उत्तरार्ध ओसाड वाटतो. कारण त्यात गोष्ट नाही. यातली हाणामारी कमाल आहे. विद्युतची चपळाई विस्मयचकीत करते. पण यात गोष्ट मागे पडते. यातली पोलिस स्टेशनमधली मारामारी मस्त झाली आहे. पण दुसऱ्या भागात हे स्टंट दाखवताना सरधोपट गोष्टी घडत जातात. खलनायकाने हिरोइनला उचलणं.. मग हिरोचा पाठलाग.. शेवटी हत्ती येणं.. याचा आपल्याला अंदाज येतो.
विद्युत जामवालला अभिनयापेक्षा स्टंट फार आवडतात. ते तो कमाल करतो. पूजा सावंत हे या निमित्ताने सरप्राईज पॅकेज आहे. तिचा वावर अत्यंत विश्वासू आहे. हिंदी सिनेसृष्टीला या निमित्ताने नवी नायिका मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अतुल कुलकर्णी यांचा खलनायक केशवही राग येणारा. आपल्या डोळ्यांचा योग्य वापर त्यांनी यात केला आहे.
पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत अडीच स्टार्स. उत्तरार्धातल्या घटनांमध्ये थोडी गोष्ट आली असती तर जास्त मजा आली असती. अटीशर्तींसह.. सिनेमाचा उद्देश चांगला आहे. हस्तीदंतासाठी हत्तींची होणारी शिकार हा महत्वाचा विषय यात मांडला आहे. हत्ती, जंगल, स्टंट आणि अर्थात अतुल कुलकर्णी, पूजा सावंत यांना पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा थिएटरमध्ये पाहायला हरकत नाही.
REVIEW | जंगली - राक्षसी महत्त्वाकांक्षेची 'हस्तीदंती' गोष्ट

महत्त्वाच्या बातम्या

Raza Murad on Mushtaq Khan: 'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा
'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा
Mushtaq Khans Son Mohsin Khan: मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
Govinda On Affair With Komal Rani: गोविंदा बायको सुनीताला सोडून कोमल राणी स्वर्णकारसोबत 'लालबागचा राजा'ला का गेला? ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला...
गोविंदा बायको सुनीताला सोडून कोमल राणी स्वर्णकारसोबत 'लालबागचा राजा'ला का गेला? ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला...
Komal Rani Swarnkar Slams Sunita Ahuja: 'जी स्वतःच्याच नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय...'; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडनं, पत्नी सुनीता अहुजाला थेट सुनावलं
'जी स्वतःच्याच नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय...'; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडनं, पत्नी सुनीता अहुजाला थेट सुनावलं

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget