Ayushmann Khurrana In Sourav Ganguly Biopic : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. अशातच आता क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) बायोपिकमध्ये आयुष्मान खुरानाची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जात आहे. 


क्रिकेटपटू सौरव गांगुलीचा बायोपिक येणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) सौरव गांगुलीच्या भूमिकेत झळकणार, असं म्हटलं गेलं. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. आता बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सौरव गांगुली या सिनेमात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.


आयुष्मान काय म्हणाला? (Ayushmann Khurrana On Sourav Ganguly Biopic)


पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत आयुष्मान खुरानाला सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल (Ayushmann Khurrana On Sourav Ganguly Biopic) प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे हसत उत्तर देत तो म्हणाला,"आता मी यासंदर्भात बोलू शकत नाही..मी हा बायोपिक केला तर लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल". दरम्यान अभिनेत्याने 'ओएमजी 2', 'गदर 2' आणि 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमांच्या यशाबद्दल भाष्य केलं.


सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये आयुष्मानची एन्ट्री झाल्याने प्रेक्षक या सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत. डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा आयुष्मान खुराना एका चॅलेंजिंग भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मानच्या चाहत्यांसह क्रिकेटप्रेमी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.






आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल 2'ने पार केला 100 कोटींचा टप्पा (Dream Girl 2 Box Office Collection)


आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या सिनेमात आयुष्मानसह अनन्या पांडे (Ananya Panday) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा, कलाकारांचा अभिनय आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता अभिनेत्याची आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 


संबंधित बातम्या


Dream Girl 2: आयुष्मानच्या ड्रीम गर्ल-2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई