Jitendra Shastri Died : 'मिर्झापूर' फेम अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jitendra Shastri) यांचे निधन झाले आहे. जितेंद्र यांनी अनेक सिनेमांसह अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. जितेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


संजय मिश्रांनी वाहिली श्रद्धांजली


जितेंद्र शास्त्री यांनी 15 ऑक्टोबरला जगाचा निरोप घेतला आहे. जितेंद्र टीवीएफच्या 'ट्रिललिंग' या वेबसीरिजमध्ये शेवटचे दिसले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्रचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. जितेंद्र यांच्या निधनाने अभिनेते संजय मिश्रा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर जितेंद्रसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत संजय यांनी लिहिलं आहे,"जीतू भावा आज तू असता तर म्हणाला असतास, "मोबाईलमध्ये माणसाचं नाव तर असतं. पण माणूस नेटवर्कमध्ये नसतो. आज तू या जगात नसलात तरी माझ्या हृदयात कायम राहशील".






जितेंद्र शास्त्री यांचे सिनेमे -


जितेंद्र शास्त्री यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जितेंद्र शास्त्री यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. इंडियाज मोस्ट वॉंटेड, चरस, लज्जा आणि ब्लॅक फ्रायडेसारख्या अनेक सिनेमांत जितेंद्र शास्त्री यांनी अभिनयाची छाप सोडली आहे. जितेंद्र शास्त्री यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 'मिर्झापूर' या वेबसीरिजमुळे जितेंद्र यांच्या लोकप्रियतेत भर पडली.  सिनेमांसह जितेंद्र शास्त्री यांनी नाटकांतदेखील काम केलं आहे.


मनोज बाजपेयीने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली


मनोज बाजपेयीनेदेखील ट्वीट करत जितेंद्र शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनोजने ट्वीट केलं आहे,"माझे वरिष्ठ आणि मुंबईतील सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करताना मला साथ देणाऱ्या जितेंद्र शास्त्री यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने खूप वाईट वाटत आहे. ते उत्तम अभिनेते असणाऱ्यासोबत माणूस म्हणूनदेखील चांगले होते. भावपूर्ण श्रद्धांजली भावा". 






संबंधित बातम्या


Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3'च्या शूटिंगला पुढच्या महिन्यापासून होणार सुरुवात; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला


Web Series New Seasons : 'द फॅमिली मॅन 3' ते 'मिर्झापूर 3'; बहुचर्चित सीरिजचे पुढचे सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला