Web Series New Seasons : दिवसेंदिवस ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. कलाकारांपासून दिग्दर्शकांपर्यंत सारेच ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवत आहेत. बिग बजेट सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत असल्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. लवकरच बहुचर्चित वेबसीरिजचे पुढचे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


द फॅमिली मॅन 3 : मनोज वाजपेयी, शारिब हाशमी यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत होते. राज निदिमोरु, कृष्णा डीके आणि सुमन कुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच या सीझनचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


आश्रम 4  : बॉबी देओल आणि ईशा गुप्ताची आश्रम ही वेबसीरिज प्रचंड गाजली. तीन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता आश्रम वेबसीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


असुर 2 : बरुण सोबती आणि अरशद बारसीची 'असुर' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. थरार नाट्य असलेल्या या सीरिजमध्ये अरशद वारसी मुख्य भूमिकेत होता. या वेबसीरिजचा दुसरा सीझन 2022 मध्ये रिलीज होणार आहे. 


स्कॅम 2003 : 'स्कॅम 1992' यशस्वी झाल्याने हंसल मेहताने आता 'स्कॅम 2003' वेबसीरिज करणार असल्याची घोषणा केली आहे. या सीरिजचे मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


मिर्जापूर 3 : गुड्डू भैया, कालीन भैयाने चांगलाच धमाका केला होता. मिर्जापूरच्या दोन्ही सीझनने धुमाकूळ घातला. आता मिर्जापूरचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप रिलीज डेटची जाहीर करण्यात आलेली नाही. 


संबंधित बातम्या


Bus Bai Bus : सुबोध भावे महिलांसाठी घेऊन येतोय खास राखीव बस; 'बस बाई बस'चा टीझर आऊट


Ekda Kay Zala : कौतुकास्पद! 'एकदा काय झालं'च्या शूटिंगदरम्यान 'प्लॅस्टिक बंदी', प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळला


Bawaal : वरुण-जान्हवीने 'बवाल'च्या शूटिंगला केली सुरुवात; फोटो शेअर करत दिली माहिती