Bhebhan : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणात नवनव्या घडामोडी घडत आहेत. भगवा कोणाचा? धनुष्यबाण कोणाचा? यावरून अनेक चर्चा रंगलेल्या देखील पाहायला मिळाल्या. त्यातच आता शशिकांत पवार प्रोडक्शन प्रस्तुत आगामी 'बेभान' (Behbhan) चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून, 'भगव्याला महाराष्ट्र विसरला' असं विधान या टीझरमध्ये देखील आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयी (Marathi Movie) नवे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. 11 नोव्हेंबरपासून ‘बेभान’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पहाता, या चित्रपटातील एक सामान्य नागरिक हे विधान करतो ते नक्की कोणाच्या बाजूने आहे? कोण विसरला आहे भगव्याला? हा चित्रपट सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर आहे का? उद्या भविष्यात या चित्रपटावर बंदी येऊ शकते का?असे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.


पाहा टीझर :



‘बेभान’ (Behbhan) हा चित्रपट दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ठाकूर अनुपसिंह मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंहनं बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. ठाकूर अनुपसिंह याच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande), संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude), स्मिता जयकर (Smita Jaykar ) आणि अभिनेते संजय खापरे (Sanjay Khapare) यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचा टीझर पाहता, त्यातील वादादीत संवाद काय आहेत? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.


साऊथच्या अभिनेत्याची मराठीत एन्ट्री


मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात असून, हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणारे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे अनुपसिंग ठाकूर (Anupsingh Thakur). आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपण त्याचे काम पाहिले असून, अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमधून देखील त्याने आपले नाव कमवले आहे.


‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज


‘झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' (Behbhan) हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यांच्याच आगामी 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटाविषयीही कमालीची उत्सुकता आहे. ‘बेभान’चा टीझर पाहून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांना 11 नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागेल.


हेही वाचा :


Bebhan : संस्कृती बालगुडेची 'बेभान'मध्ये धमाकेदार एन्ट्री, 11 नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज!