Jitendra Joshi Childhood Story : अभिनेता जितेंद्र जोशी याने आपल्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे. गंभीर असो, विनोदी किंवा आणखी काही, जितेंद्र जोशीने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत त्याने जीव ओतला आहे. याचं त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालेलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने अनेक हिंदी, मराठी टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याचा कोणता चित्रपट नाही, तर त्याने केलेलं वक्तव्य. जितेंद्र जोशी याने त्याच्या बालपणीचा किस्सा शेअर केला आहे.


अभिनेत्याने चोरला होता 'या' दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो


अभिनेता जितेंद्र जोशी याने अलिकडेच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे आणि यामुळे तो चर्चेत आला आहे. जितेंद्र जोशीने बालपणात केलेल्या पहिल्या चोरीचा किस्सा सांगितला आहे आणि यानंतर त्याचा घरातून पडलेल्या माराबद्दलही सांगितलं आहे. जितेंद्र जोशी याने अलिकडे श्रेयस तळपदे याच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत जितेंद्र जोशीने त्याने केलेल्या पहिल्या चोरीबद्दल सांगितलं आहे.


नेमकं काय घडलं?


जितेंद्र जोशीने सांगितलं की, "आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, जे आई-वडिलांना माहित नसतात, पण मित्रांना माहीत असतात. अशी गोष्ट म्हणजे पहिली चोरी. याबद्दल मी घरी सांगितलं नव्हतं, पण त्यांना कळलं. मी लहान असताना अमिताभ बच्चन यांचा फोटो चोरला होता. मित्रासोबत पोहायला जाताना एका दुकानात बच्चन साहेबांचा दिवार चित्रपटातील फोटो पाहिला. त्याची किंमत होती एक रुपया. त्यावेळी पैसे नव्हते. मित्र म्हणाला, बघत राहायचं आणि दुकानदाराचं लक्ष नसेल तेव्हा लगेच काढून घ्यायचं. तोपर्यंत कधी चोरी केली नव्हती, पण मला कल्पना आवडली. दुकानदाराचं लक्ष दुसरीकडे असताना मी फोटो घेतला, पण, तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं. यानंतर मी घराकडे धूम ठोकली. घरी आल्यावर सांगितलं की, मित्राने फोटो दिला आहे".


"वाड्याच्या वरच्या मजल्यावर बच्चन साहेबांचा फोटो दाखवायला गेलो, तोपर्यंत खालून मोठमोठ्याने आवाज ऐकू यायला लागला. तो दुकानदार मला ओळखत होता, पण मला माहित नव्हतं. मी वरुन पाहिलं तर, मला आई आणि तिची चप्पल दिसत होती, त्यानंतर मी खूप मार खाल्ला. ती माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची चोरी", असं जितेंद्र जोशीने सांगितलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई तरीही निर्मात्यांचं कोट्यवधींचं नुकसान; नेमकं काय चुकलं?