Singham Again Box Office Collection : बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेन चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज झाला. अवघ्या काही दिवसांतच चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिंघम अगेन चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली आहे. दरम्यान, मल्टीस्टारर सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत असला, तरी निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
जोरदार कमाई तरीही निर्मात्यांचं कोट्यवधींचं नुकसान?
दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा बॉक्स ऑफिसवर अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांच्यात टक्कर पाहायला मिळाली. 1 नोव्हेंबरला अजय देवगणचा सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटांची जोरदार टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही चित्रपटांनी पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ठिक ठाक कमाई केली आहे. दोन्ही चित्रपट 100 कोटींच्या घरात पोहोचले आहेत. पण, हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज न करता वेगवेगळ्या वेळी रिलीज करण्यात आले असते, तर एका चित्रपटाने एवढी कमाई केली असती आणि हे आणखी हिट ठरले असते.
सिंघम अगेने आणि भूल भुलैया 3 ची जोरदार टक्कर
रोहित शेट्टी निर्मित आणि दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपट आधी 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण, या दिवशी पुष्पा 2 रिलीज करण्यात येणार होता. त्यानंतर या दोन्ही चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चित्रपटाची रिलीज डेट आधीच जाहीर करण्यात आली होती, तरीही रोहित शेट्टीचा सिंघम अगेन त्याच दिवशी रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आणि या निर्णयामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
बजेट अन् स्टारकास्टच्या तुलनेनं किरकोळ कमाई
सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जोरदार कमाई केली आहे, असं वाटत असेल. पण चित्रपटाचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट लक्षात घेता, ही कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. इतके दिग्गद स्टार्स असलेला, दिवाळीच्या मुहूर्तावर आणि सिंघमसारखी हिट फ्रँचायझी असलेला चित्रपट 50 कोटींची ओपनिंगही मिळवू शकत नसेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित होतात.
निर्मात्यांचं नेमकं काय चुकलं?
सिंघम अगेन चित्रपट इतर चित्रपटासोबत क्लॅश झाला नसता, तर याचा आणखी चांगली ओपनिंग मिळण्याची शक्यता होती. सिंघम अगेन चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा होण्याच्या खूप आठवडे आधीच भूल भुलैया 3 ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. दोन्ही चित्रपटांची टक्कर टाळण्यासाठीसप्टेंबर महिन्यात कार्तिक आर्यनने रोहित शेट्टीला फोन करून सिंघम अगेनच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. जर बॉक्स ऑफिसवरील हा क्लॅश टळला असता, तर दोन्ही चित्रपटांचं कोट्यवधींचं नुकसान टळलं असतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :