एक्स्प्लोर

SRK VS Jayant Patil : असशील तू कोणीही मोठा स्टार..जेव्हा जयंत पाटलांनी शाहरुखला चारचौघात झापलं

किंगखान शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी चारचौघात झापल्याचा एक किस्सा पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

मुंबई : किंगखान, बादशाह, मेगास्टर, सुपरस्टार अशी अनेक विशेषणं एका व्यक्तीशी जोडली गेली आहेत, ही व्यक्ती म्हणजे अर्थातच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान. नुकताच या किंगचा प्रिन्स म्हणजेच आर्यन खान एका ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे अनेक दिवसांपासून तुरुंगवसात होता. 30 ऑक्टोबरला आर्यनची जामिनावर सुटका झाली आणि शाहरुख खानला अनेक दिवसांनी पाहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांनी हसताना पाहिलं. या प्रकरणानंतर किंगखान शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी चारचौघात झापल्याचा एक किस्सा पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

3 नोव्हेंबर 2017 ची गोष्ट आहे. शाहरुख आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परत येत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे ऑफ इंडिया इथं आला, त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं  निघाली होती. मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं.

जयंत पाटील यांनी शाहरुखला काय सुनावलं?

‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं. . जयंत पाटील आपल्या बोटीने पुढे गेल्यानंतर शाहरुख शांतपणे बोटीतून बाहेर पडतो आणि निघून जातो. शाहरुख यावेळी जयंत पाटील यांना काहीच उत्तर न देता निघून गेला.

तरीही शाहरुख शांतच होता!
दरम्यान, जयंत पाटलांचा राग अनावर झाल्यानं शाहरुखने बोटीत बसून राहणंच पसंत केलं. यावेळी त्यानं कोणतंही उत्तर त्यांना दिलं नाही. पाटील आपल्या बोटीकडे निघून गेल्यानंतरच शाहरुख आपल्या बोटीतून बाहेर आला. शाहरुख बाहेर येताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा संपूर्ण प्रकार तेथील एका चाहत्यानं रेकॉर्ड केला.

शाहरुख खानची एकंदरीत कहाणी ही फार प्रेरणादायी आहे. त्याच्याकडून खूप कही शिकण्यासारखं आहे पण किंग असो वा बादशाह, चुकीला माफी नाही असंच म्हणावं लागेल.

वाचा : आमदार जयंत पाटील शाहरुखच्या चाहत्यांसमोरच भडकले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Embed widget