Jawan Prevue : अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शहारुखचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रीव्यूमध्ये जवान चित्रपटाच्या स्टार कास्टची झलक दाखवण्यात आली आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची देखील झलक दिसली. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...


जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये अभिनेत्री गिरिजा ओकची (Girija Oak) झलक दिसली. या प्रीव्यूमध्ये गिरिजा ही अॅक्शन मोडमध्ये दिसली. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये  दिसले की, गिरिजाच्या हातात बंदुक आहे आणि ती फायरिंग करत आहे. 



गिरिजा ओकनं मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं  हुप्पा हुइय्या, गुलमोहर  या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं कला, शोर इन द सिटी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता जवान या चित्रपटात गिरिजाचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


गिरिजा ओक ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. गिरिजानं जवान चित्रपटाचा प्रीव्यू सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'We are good to go, Chief!'. गिरिजाला अनेक जण सध्या तिच्या जवान या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. 


जवान कधी होणार रिलीज?


विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण हे कलाकार देखील जवान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. अॅटलीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गौरी खाननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुखचे चाहते जवान या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


पाहा जवान चित्रपटाचा प्रीव्यू






शाहरुखच्या जवान या चित्रपटाबरोबरच त्याचा डंकी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अ‍ॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट