Somy Ali : प्रसिद्ध अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) सलमान खानसोबतच्या (Salman Khan) रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. सोमी ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. ती नाव न घेता एका अभिनेत्यावर पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधते. नुकतीच सोमीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सोमीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'मला पोस्ट काढण्यास सांगितले जाईल. मला माझ्या विवेकाबद्दल विचारले जाईल. मला मद्यपानाची समस्या असल्यामुळे माझ्याबद्दल गप्पा मारल्या जातील, तरीही मी पुढे जाईन कारण तुम्ही अशा प्रकारचा अपमान, सर्व प्रकारचा छळ आणि अत्याचार सहन केलेला नाही. कोणीही माझी बाजू घेणार नाही कारण लोक विचार करतात की, तुमच्यासोबत गैरवर्तन करणारा मोठा स्टार आहे आणि तुम्ही त्याचे मित्र आहात. हे तुमचे करियर बनवू किंवा बघडवू शकतात. तुम्ही तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवला आणि ते तुमच्यासाठी उभे राहतील असे गृहीत धरले.'


पुढे पोस्टमध्ये सोमीनं लिहिलं,  'मी एका चांगल्या व्यक्तीबद्दल इथे बोलते,  ज्याने असे सांगितले होते की, हा गैरवर्तन करणारा माणूस अतिशय प्रेमळ आहे. लक्षात ठेवा. मी एका अभिनेत्याचा उल्लेख करत आहे ज्याच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, परंतु मला हे देखील माहित आहे की, तो बंधनात आहे.  तुम्ही मला कधीच शांत करु शकणार नाही. ह्याचाही शेवट असेल, हे खूप आनंदी शेवट असलेल्या एका भयपट चित्रपटासारखं आहे.  तुम्ही मला ट्रोल होण्याआधी आणि माझ्याबद्दल वाईट शब्द लिहायला सुरुवात करण्यापूर्वी, मी तुम्हाला सांगतो की, मी ते वाचत नाही आणि माझ्याकडे यासाठी वेळ नाही.'






'मला आलेला अनुभव चांगला की वाईट हे तुम्हाला माहीत नाही. ज्याने तुम्हाला काहीही केले नाही अशा व्यक्तीबद्दल तुम्ही फक्त अनुमान लावत आहात. कृपया यावर थोडा विचार करा, हे फक्त माझ्यासाठीच नाही तर इतर अनेकांसाठी ज्यांना ऑनलाइन धमकावले जाते. हे थांबायला हवे' असंही पोस्टमध्ये सोमीनं लिहिलं.


सोमी अलीनं  'टारझन' आणि 'हम' या चित्रपटांमध्ये कामं केलं, सोमी ही 1990 मध्ये सलमानला डेट करत होती. पण काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, असं म्हटलं जातं.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Somy Ali : सोमी अलीचा पुन्हा सलमानवर निशाणा; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मारहाण करणारा, फक्त मलाच नाही...'