Shah Rukh Khan Jawan And Dunki Creates Records : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. 2023 च्या सुरुवातीलाच या सिनेमाने मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. आता त्याचे 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunky) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
'जवान' आणि 'डंकी'ने रिलीजआधीच केली 500 कोटींची कमाई
शाहरुख खान सध्या 'जवान' आणि 'डंकी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने 'जवान' सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून राजकुमार हिरानीने 'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता रिलीजआधीच या सिनेमांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. दोन्ही सिनेमांनी आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'डंकी' या सिनेमाचे सॅटेलाइट, डिजिटल आणि म्यूझिकल राइट्स विकले गेले आहेत. 'जवान' आणि 'डंकी' या सिनेमांचे राइट्स वैरिड प्येयरने (varied Players) विकत घेतले आहेत. 450-500 कोटींमध्ये त्यांनी या सिनेमाचे राइट्स घेतले आहेत. 'जवान' या सिनेमाचे राइट्स 250 कोटी आणि 'डंकी'चे राइट्स 230 कोटींमध्ये विकले गेले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाचे राइट्स सर्व भाषांमध्ये विकले गेले आहेत. तर 'डंकी' या सिनेमाचे फक्त हिंदीतले राइट्स विकले गेले आहेत. एकंदरीतच दोन्ही सिनेमांनी रिलीजआधीच 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे 'डंकी' आणि 'जवान' या दोन्ही सिनेमांची निर्मिती किंग खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेन्टच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे.
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता
'जवान' या सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात तो नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा सिनेमा 7 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर 'डंकी' हा सिनेमा नाताळ 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या