एक्स्प्लोर

Javed Akhtar : जावेद अख्तरांकडून आरएसएसशी तालिबानसोबत तुलना; 20 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार, अन्यथा...

Javed Akhtar : आरएसएसची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर मुलुंड न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

Javed Akhtar : लोकप्रिय लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. आज यावर सुनावणी होणार होती. पण जावेद अख्तर आज न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

जावेद अख्तर आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता 20 एप्रिल 2023 रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 20 एप्रिलला जावेद अख्तर यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. जर 20 एप्रिललादेखील जावेद अख्तर न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केली जाण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय? 

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. तसेच त्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. एका मुलाखतीत अख्तर म्हणाले होते की,"आरएसएस, बजरंग दल आणि तालिबान सारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे. परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील".

जावेद अख्तर पुढे म्हणाले होते,"आरएसएस आणि तालिबान दोघांमध्ये फक्त नावाचा फरक आहे. दोघांची मानसिकता सारखीच आहे. तालिबानला इस्लामिक राज्य निर्माण करायचं आहे. तर दुसरीकडे यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. या लोकांना मुलगा आणि मुलगी एकत्र उद्यानात जाऊ नये असं वाटतं. दोघांमधील फरक इतकाच आहे की ते अद्याप तालिबानइतके शक्तिशाली नाहीत, पण तालिबानी लोकांच्या ध्येयासारखचं यांचंदेखील ध्येय आहे". 

जावेद अख्तर म्हणाले की, "ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत."

भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतोय असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं. जावेद अख्तर म्हणाले की, "तालिबान आणि त्यांच्या सारखं वागायची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याचं स्वागत केलं आहे. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टीच्या मागे लागले आहे. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट असा आहे की जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात."

संबंधित बातम्या

Javed Akhtar: जावेद अख्तर यांना लंडनच्या विद्यापिठाकडून मानद पदवी बहाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!Jitendra Awhad Speech On Akshay Shinde : अक्षय शिंदेंच बनावट एन्काऊंटर, मग पोलिस गुन्हा दाखल का करत नाही?ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 25 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAjit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Embed widget