Jailer Actor Vinayakan Arrested : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आता या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला (Vinayakan Arrested) अटक करण्यात आली आहे. 


'या' कारणाने विनायकने अटकेत


अभिनेता विनायकनला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीस ठाण्यात अभिनेत्याने दारुच्या नशेत राडा केला आहे. विनायकन यांना त्यांच्या सोसायटीत काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना बोलावलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यात राडा केल्याने विनायकनला अटक करण्यात आली आहे". 






दारूच्या नशेत विनायकन पोलिस ठाण्यात गेला होते. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांसोबत त्याने विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी त्याच्यावर गोंधळ घालणे आणि पोलिसांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या सिनेमात रजनीकांत यांचा दमदार अभिनय आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला. रजनीकांतसह या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विनायकननेही सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. जेलर या सिनेमात त्याने वर्मन ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली. विनायकन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 






विनायकनबद्दल जाणून घ्या... (Who is Vinayakan)


विनायकन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत संगीतकार आणि 
पार्श्वगायक आहे. मल्याळम आणि तामिळ सिनेमांत त्याने काम केलं आहे. 1995 रोजी 'मत्रिकम' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 2016 मध्ये ‘कमातीपद्म’ या सिनेमातील कामासाठी त्याला केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. आता रजनीकांतच्या जेलर या सिनेमाने विनायकनला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आहे. विनायकनने आजवर अनेक दाक्षिणात्य सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.


संबंधित बातम्या


Jailer OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला रजनीकांतचा 'जेलर' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या कुठे पाहता येईल...