Shraddha Kapoor Bought New Lamborghini Car : शक्ती कपूर यांची लेक आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या चर्चेत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. श्रद्धाने ही कार स्वत:लाच भेट केली आहे. अभिनेत्रीचे कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


श्रद्धा कपूरने नवी लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. अभिनेत्री कारची शौकीन आहे. आता तिच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनीचाही समावेश झाला आहे. कार शोरूम ऑटोमोबिली आर्डेंट इंडियाने एका पोस्टद्वारे श्रद्धाने नवीन लॅम्बोर्गिनी खरेदी केल्याबाबत माहिती दिली आहे. शोरूमने सोशल मीडियावर श्रद्धाचे तिच्या नवीन कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत.




ऑटोमोबिली आर्डेंट इंडियाने श्रद्धाचे कारसोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,"कोणतीही विचित्र गोष्ट नाही... श्रद्धा कपूरने नुकतीच ह्यूराकन टेक्निका खरेदी केली आहे. श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची मोठी सेलिब्रिटी नाही. पण तिची गणना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत होती. अभिनेत्रीने आता 'रोसो एंटेरोस लॅम्बोर्गिनी ह्यूराकन टेक्निका' (Rosso Anteros Lamborghini Huracan Tecnica) गाडी खरेदी केल्याने आम्हाला आनंद होत आहे.


श्रद्धाने घेतलेल्या 'लॅम्बोर्गिनी'ची किंमत काय? (Shraddha Kapoor Lamborghini Car Price)


श्रद्धा कपूरचे लाल रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारसोबत पोज देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. श्रद्धाने घेतलेल्या लॅम्बोर्गिनी कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. ऑटोटेक पोर्टलनुसार, याआधी श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली होती. तिची किंमत 2.46 कोटी रुपये होती. त्यापूर्वी अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ जीएलई होती. त्या गाडीची किंमत 1.01 कोटी रुपये होती.


श्रद्धाचे आगामी प्रोजेक्ट (Shraddha Kapoor Upcoming Project)


श्रद्धा कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत होता. आता 'स्त्री 2' या आगामी सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसेल.


संबंधित बातम्या


Shraddha Kapoor: 'लग्न कधी करणार?' नेटकऱ्याचा प्रश्न; श्रद्धा कपूर म्हणते,' शेजारच्या काकू तुम्ही...'