Isha Ambani : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची लेक ईशा अंबानी (Isha Ambani) सध्या चर्चेत आहे. ईशाने तिचं घर जवळपास 500 कोटी रुपयांना विकलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील बेवर्ली हिल्स या क्रीम एरियामध्ये ईशाचं हे घर आहे. ईशाचा हा बंगला हॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं जेनिफर लोपेज (Jennifer Lopez) आणि बेन एफ्लेक (Ben Affleck) यांनी विकत घेतला आहे.
प्रेग्नंसीदरम्यान आईसोबत राहिलेली...
ईशा अंबनीने विकलेल्या घरात 12 बेडरूम, 24 बाथरुम, इनडोअर फिकलबॉल कोर्ट, जिम, सलून, स्पा अशा अनेक आधुनिक सुविधा आहेत. 5.2 एकरमध्ये पसरलेला हा बंगला आहे. ईशा अंबानी प्रेग्नंट असताना तिने आपला जास्तीत जास्त वेळ या बंगल्यातच घालवला आहे. त्यावेळी ईशासोबत तिची आई नीता अंबानीदेखील (Nita Ambani) या घरात राहायची. आता ईशाने हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला आहे. जेनिफर लोपेझ आणि बेन एक्लेक यांनी हा बंगला विकत घेतला आहे. ईशाचा हा बंगला 5.2 एकरमध्ये पसरलेला आहे. यात सर्व लक्झरी सुविधा आहेत. घराबाहेर एक मनोरंजनासाठी पवेलियन, स्वयंपाकघर आणि लॉनदेखील आहे.
मुंबईत 'या' आलिशान घरात राहते ईशा अंबानी
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बेवर्ली हिल्स येथील ईशा अंबानीच्या बंगल्याचं डील झालं आहे. अंबानी कुटुंबियांप्रमाणे त्यांची घरेदेखील नेहमी चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांचा 'अँटिलिया' हा बहुमजली बंगला मुंबईत आहे. ईशा अंबानीचं आनंद पिरामलसोबत लग्न झालं आहे. आनंदच्या आई-वडिलांचं नाव अजय पिरामल आणि स्वाती पिरामल असं आहे. आनंदला त्यांनी 2018 मध्ये एक आलिशान घर दिलं आहे. या बंगल्याचं नाव 'गुलिता' (Gulita) असं आहे.
कोण आहे ईशाचा पती आनंद पीरामल?
ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल हे अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आहे. पिरामल ग्रुपचे ते नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहतात. त्यांचे आई-वडील याच कंपनीचे संस्थापक आहेत. आनंद पिरामल यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल, बोस्टन येथून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवीही मिळवली. 31 मार्च 2023 पर्यंत पिरामल समूहाची एकूण मालमत्ता 83,752 कोटी रुपये होती.
ईशा अंबानीच्या राहत्या घराची किंमत किती?
मीडिया रिपोर्टनुसार ईशा अंबानीचं राहतं घर अर्थात 'गुलिता'ची किंमत 450 कोटी रुपयांच्या आसपास आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घरात ओपन एअर स्विमिंग पूल, डायमंड रुम, तीन मजली पार्किंग, मल्टिपल डायमिंग एरिया सारख्या सुविधा आहेत. घरात काम करणाऱ्या लोकांसाठीदेखील विशेष खोल्या आहेत.
संबंधित बातम्या