Pakistan Women Look Like Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रींनी (Bollywood Actress) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातील चाहत्यांना भुरळ घातली आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जगभरात चांगलीच क्रेझ आहे. आपल्या देशात बॉलिवूड अभिनेत्रींसारखं दिसावं, राहावं यासाठी अनेक महिला विविध प्रयत्न करताना दिसून येतात. तर दुसरीकडे पाकिस्तानातील महिलांनादेखील बॉलिवूड अभिनेत्रींसारखं दिसायचं असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. अभिनयासह हटके फॅशनमुळेदेखील दीपिका सोशल मीडियावर चर्चेत असते. भारतच नव्हे तर पाकिस्तानमध्येही अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पाकिस्तानी डिझायनरने खुलासा केला आहे की,"पाकिस्तानी महिला दीपिका-आलियाप्रमाणे दिसण्याची इच्छा व्यक्त करतात". 


पाकिस्तानी महिलांमध्ये दीपिका पादुकोणची क्रेझ


ताबिश हाशमी यांच्या 'हंसना मना है' या कार्यक्रमात पाकिस्तानी डिझायनर नोमी अंसारी यांनी हजेरी लावली. दरम्यान पाकिस्तानी महिलांबद्दल त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.  पाकिस्तानी महिला मेकअप करायला येतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा काय असतात? या प्रश्नाचं उत्तर देताना नोमी म्हणाले,"पाकिस्तानी महिला जेव्हा मेकअप करायला येतात तेव्हा त्यांची खास डिमांड असते. या सर्व अभिनेत्रींना फक्त बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसारखं दिसायचं असतं". नोमी आपल्या मॉर्डन मीट्स ट्रेडिशनल डिझाईनसाठी लोकप्रिय आहेत. 


आलिया अन् दीपिकाचा मेकअप ट्रेंडमध्ये (Deepika Padukone Alia Bhatt Makeup)


नोमी पुढे म्हणाले,"पाकिस्तानातील महिलांना आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि दीपिका पादुकोणसारखं (Deepika Padukone) दिसायचं आहे. पण त्यांची ही इच्छा पूर्ण करणं माझ्यासाठी अवघड आहे. या महिलांची शरीरयष्टी आणि फेसकट हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे मेकअप करून त्या या बॉलिवूड अभिनेत्रींसारख्या दिसू शकत नाहीत. या महिलांना मी आलिया भट्टसारखं बनवू शकत नाही. पण आलियाचे वडील महेश भट्ट यांच्यासारखा लूक देऊ शकतो". 


दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहवर (Ranveer Singh) सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रेग्नंसीच्या बातमीनंतरही अभिनेत्री रणवीर सिंहसोबत एयरपोर्टवर दिसून येते. दुसरीकडे आलिया भट्ट आपल्या ट्रेंडी फॅशन आणि न्यूड मेकअपमुळे चर्चेत असते. 'मेट गाला 2023'मध्ये आलिया भट्ट आणि दीपिकाने आपल्या फॅशनेबल लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.


संबंधित बातम्या


Taapsee Pannu Wedding Video : कोणाला न सांगता लपूनछपून लग्न केलेल्या तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ लीक झालाच