झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 02:40 PM (IST)

मुंबई : क्रिकेटक युवराज सिंह आणि अभिनेत्री-मॉडेल हेजल कीच यांच्या लग्नात फक्त विराट-अनुष्काच आकर्षणाचं केंद्र नव्हते, तर आणखी एका क्रिकेटरवरही सगळ्यांचं लक्ष होतं. तो क्रिकेटर म्हणजे झहीर खान. झहीर खान 'चक दे इंडिया' या सिनेमातील अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत युवराजच्या लग्नाला हजर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा झहीर खान मागील चार महिन्यांपासून 'चक दे' गर्ल सागरिकासोबत डेटिंग करत आहे. एका कॉमन फ्रेण्डद्वारे या दोघांची भेट झाली आणि काही काळातच ते दोघे जवळ आले. आता झहीर आणि सागरिका अनेक कार्यक्रमात आणि पार्टीमध्ये एकमेकांसोबत दिसतात. सुत्राच्या माहितीनुसार, दोघांमधील नातं आणखी दृढ झालं आहे. गोव्यात युवराज आणि हेजलच्या लग्नाबरोबरच जयपूरमधील एका कार्यक्रमातही दोघे एकत्र दिसले होते.