मुंबई: बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता उपचारानंतर अखेर इरफान भारतात परतल्याची माहिती मिळाली आहे. न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजल्यानंतर इरफानचे फॅन्स दुखावले आणि ट्यूमरच्या ट्रिटमेंटसाठी तो लंडनला रवाना झाला.


उपचारानंतर परतताना त्याला मुंबई एअरपोर्टवर व्हील चेअरवर बसलेलं पाहिलं गेलं. व्हील चेअरवर बसलेल्या इरफानचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या आजारपणाचे वेगवेगळे तर्क लावले. मात्र त्याचे उपचार यशस्वीरित्या पार पडल्याचं त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.



इरफानने आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता, मीडियाला टाळण्याचाही त्याने प्रयत्न केला. गेल्यावर्षी कॅन्सर झाल्याचं इरफानने ट्वीट केलं होतं, कॅन्सरच्या उपचारासाठीच तो जवळपास वर्षभर लंडनलाच होता. आता त्याला परतल्याचं पाहून फॅंसही आनंदात आहेत.


इरफानने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही उत्तम काम केलंय, लाइफ ऑफ पाय, जुरासिक वर्ल्ड, द अमेझिंग स्पायडरमॅन, स्लमडॉग मिलियनेयर अशा अनेक हॉलिवूड हिट चित्रपटांचाही इरफान भाग राहिला आहे. वर्षभराच्या ब्रेकनंतर आता लवकरच इरफान रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार अशा चर्चा आहेत.


2017 मधील हिंदी मीडियम चित्रपटाच्या रीमेकमध्ये इरफान आता दिसणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान इरफानच्या पत्नीच्या रुपात आपल्याला दिसणार आहे, तर राधिका मदन दोघांच्या मुलीचं पात्र करणार आहे.


कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानचं वेदनादायी पत्र



इरफानच्या आजारपणावर पत्नीची फेसबुक पोस्ट


हिंदी मीडियम या 2017 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात इरफानसोबत सबा करीम झळकली होती. साकेत चौधरीने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक होमी अडजानियांकडे दिग्दर्शनाची धुरा सोपवली जाणार आहे.


यापूर्वी, उपचारांमुळे इरफानने दोन प्रोजेक्ट्समधून माघार घेतली होती. दीपिका पादूकोणसोबत विशाल भारद्वाज दिग्दर्शित एका चित्रपटातून त्याने बॅकआऊट केलं, तर 'गॉरमिंट' ही राजकीय उपहासात्मक वेब सीरिजही त्याने सोडली. काहीच आठवड्यांपूर्वी त्याची मुख्य भूमिका असलेला 'कारवां' चित्रपट प्रदर्शित झाला होता.


संबंधित बातम्या


दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट


अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर