Ira khan And nupur shikhare Reception: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचे उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. त्यानंतर काल संध्याकाळी मुंबईत या जोडप्याचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूडमधील कलाकार, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आयरा खान आणि नुपूर शिखरे  यांना शुभेच्छा देण्यासाठी या ग्रँड वेडिंग रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली. 


आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.






मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावून आयरा खान आणि नुपूर शिखरे  यांना शुभेच्छा दिल्या. 






तसेच आदित्य ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासोबत आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.  आयराच्या या रिसेप्शन पार्टीत मुकेश अंबानी हे पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत उपस्थित होते.






रिसेप्शन सोहळ्याला या कलाकारांनी लावली हजेरी


आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, जया बच्चन, श्वेता बच्चन, सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी,रेखा, अनिल कपूर या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. या सेलिब्रिटींचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


3 जानेवारी रोजी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ira-Nupur Wedding Reception : लेक आयराच्या रिसेप्शनमधील आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, जावयाला म्हणाला...