Ira-Nupur Wedding Reception : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी आयरा खान (Ira Khan) हिचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला. 3 जानेवारीला आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांनी रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर या दोघांचं मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार पडलं. आयरा आणि नुपूरचं रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (Nita Mukesh Ambani Cultural Centre) मोठ्या दिमाखात पार पडलं. या ग्रँड रिसेप्शनला सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू आणि नेते मंडळींसह दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.


आमिरची लेक आयरा आणि नुपूरचं ग्रँड रिसेप्शन


अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खानने नुपूर शिखरेसोबत लग्न केलं आहे. रजिस्टर मॅरेज आणि नंतर उदयपूरमध्ये शाही लग्नसोहळ्यानंतर, या जोडप्याचं ग्रँड रिसेप्शन 13 जानेवारीला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शन पार्टीचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही समोर आळे आहेत. दरम्यान, रिसेप्शनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये वडील आमिर खान मुलगी आयरा आणि जावई नुपूर याला मीडिया समोर पोज द्यायला शिकवत आहेत.


लेकीच्या रिसेप्शनमधील आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल






मुलगी आणि जावयाचा पोज सांगताना आमिर खान


आमिर खान मुलगी (Amir Khan Daughter) आणि जावयाला (Amir Khan' Son in Law) पोज सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आयरा खान आणि नुपूर शिखरे त्यांच्या रिसेप्शनच्या रेड कार्पेटवर पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत. यावेळी, आमिर खान त्याची लाडकी आयरा आणि जावई नुपूरला पापाराझींसाठी कसे पोज द्यावे हे सांगत आहे. 'आज मी एडी बनणार आहे' असे आमिर खान म्हणताना ऐकायला मिळत आहे.


आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह सोहळा


आमिर खानची मुलगी आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा नुकताच 10 जानेवारी रोजी उदयपूर येथे विवाह झाला. या कपलने, ज्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.  कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी आयरा आणि नुपूरचा मेहंदी आणि संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आयराचे चुलत भाऊ, झेन मेरी आणि इम्रान खान आणि आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी, किरण राव या उत्सवात सहभागी झाले होते. उदयपूरमधील शाही विवाह सोहळ्यापूर्वी, आयरा आणि नुपूरने 3 जानेवारीला मुंबईत रजिस्टर मॅरेज केलं.