Ira Khan-Nupur Shikhare Wedding : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचा शाही विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडला आहे. या डेस्टिनेशन लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आमिर खानची लेक हिंदू की मुस्लिम पद्धतीने लग्नबंधनात अडकणार याची सर्वांना उत्सुकता होती. पण आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे.


आयरा आणि नुपूरने थाटामाटात लग्न केलं आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयराने नुपूरसोबत ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. लग्नाआधी मेहंदी आणि संगीतासोहळ्याची झलक समोर आली होती. 


आयराने ख्रिश्चन पद्धतीने बांधली लग्नगाठ (Ira Khan-Nupur Shikhare Wedding)


आयरा आणि नुपूर लग्नसोहळ्यादरम्यान खूपच आनंदी दिसत होते. नववधू आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेने राखाडी रंगाचा फॉर्मल सूट घातला होता. हातात सुंदर फुलांचा बुके घेऊन आयरा रेड कार्पेटवर चालताना दिसून आली. 






आयरा-नुपूर लग्नानंतर थिरकले


आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी लग्नबंधनात अडकल्यानंतर डान्स करत उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर एकीकडे त्यांचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्यात रीना दत्ता (Reena Dutta) आणि किरण रावदेखील (Kiran Rao) उपस्थित होते. 


आयरा-नुपूरचं मुंबईत होणार ग्रँड रिसेप्शन!


आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शन होणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 13 जानेवारी 2024 रोजी त्यांचं रिसेप्शन होणार आहे. रिसेप्शनसाठी आज आयरा-नुपूर उदयपूरहून मुंबईला रवाना होतील.


आयरा-नुपूरचं दुसरं लग्न


आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी 2024 रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आयरा-नुपूर 2020 पासून एकमेकांना डेट करत होते. अखेर आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.


संबंधित बातम्या


VIDEO: आमिरच्या जावयाचा पुन्हा हटके अंदाज; 'लुंगी डान्स' गाण्यावर आयराच्या पतीचा जबरदस्त डान्स