Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि तिचा पती नुपूर शिखरचे (Nupur Shikhare) यांचे वेडिंग फंक्शन्स उदयपूरमध्ये सुरू झाले आहेत. आयरा आणि नुपूर यांनी मुंबईत रजिस्टर मॅरेज केले.आता हे दोघेही उदयपूरमध्ये लग्नाचे फंक्शन्स एन्जॉय करत आहेत. त्यांच्या वेडिंग फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 8 जानेवारी रोजी नुपूरनं पजामा पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सर्वांनी जोरदार डान्स केला. पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नुपूर शिखरे शाहरुख खानच्या लुंगी डान्स या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे.
'लुंगी डान्स'वर थिरकला नुपूर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नुपूर हा पांढरा टी-शर्ट आणि लुंगी अशा लूकमध्ये दिसत आहे. तो आपल्या मित्रांसोबत लुंगी डान्स गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे.
सारंग, पॉला आणि मिथिलासोबत नुपूरचानं केला डान्स
8 जानेवारीला आयरा आणि नुपूरचा मेहंदी सोहळाही पार पडला. मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये नुपूर हा मिथिला पालकर, सिद्धार्थ मेनन ,सारंग साठे,पॉला मॅक ग्लेन यांच्यासोबत जुगनू या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
आयरा आणि नुपूरचा संगीत सोहळा हा आज उदयपूरमध्ये होणार आहे. उद्या म्हणजेच 10 जानेवारीला दोघेही रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, 13 जानेवारीला मुंबईत आयरा आणि नुपूर हे रिसेप्शन देणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
आमिरचा जावई नुपूर शिखरेच्या हटके वरातीची चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली. आयराचा पती नुपूर शिखरे हा मुंबईमध्ये झालेल्या रजिस्टर मॅरेजच्या वेडिंग वेन्यूपर्यंत जॉगिंग करत पोहोचला होता. तो टी-शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये लग्नाच्या वरातीत सामील झाला. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते.
महत्वाच्या बातम्या :