Ira Khan Nupur Shikhare First Selfie After Wedding : आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकली आहे. आयरा आणि नुपूर यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आयराने नुपूरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


आयराने शेअर केला लग्नानंतरचा पहिला सेल्फी (Ira Khan Shared First Photo After Wedding)


आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता लग्नानंतर आयराने आपला पहिला सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयरा पती नुपूरसोबत बेडरुममध्ये दिसत आहे. 



आयराने नुपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या डोक्यात 'ब्राइड टू बी'वाला बँड दिसून येत आहे. पण त्यावेळी 'टू बी' हे खोडण्यात आले आहे. 


जिममध्ये सुरु झालेली लव्हस्टोरी (Ira Khan Nupur Shikhare Lovestory)


आयराचा पती नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. अनेक लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटींचा तो जिम ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूरची पहिली भेटदेखील जिममध्येच झाली होती. आयरा आणि नुपूरने 2020 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. तीन वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर आता त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. आयराला नैराश्यातून बाहेर काढण्यात नुपूरचा मोठा वाटा आहे. आमिरने त्याबद्दल अनेकदा त्याचं कौतुक केलं आहे.






रजिस्टर मॅरेजनंतर उदयपूरमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने नुपूर आणि आयरा लग्नबंधनात अडकणार आहेत. 8 जानेवारीपासून या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 13 जानेवारी 2024 रोजी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईत शाही रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.


आयरा आणि नुपूरचा शाही विवाहसोहळा 


आयरा आणि नुपूर यांनी 3 जानेवारी 2024 रोजी मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केलं आहे. यावेळी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी हजेरी लावली होती. आता 8 डिसेंबरला उदयपूरमधील ताज अरावली रिसॉर्ट अँड स्पा या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.


संबंधित बातम्या


Aamir Khan : लेकीच्या लग्नात 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लाइमलाईटमध्ये, भर मंडपात पहिल्या बायकोसमोर दुसऱ्या बायकोला केलं किस; नेटकऱ्यांनी घेतली शाळा