Ira Khan and Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची एक्स वाईफ रीना दत्ता (Reena Dutta) यांच्या मुलीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. आमिर आणि रीना यांची मुलगी आयरा खानने (Ira Khan) उदयपूरमध्ये नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ख्रिश्चन पद्धतीने आयरा आणि नुपूर यांनी लग्न केलं. आयरा आणि नुपूरच्या लग्नात आमिर भावूक झाला.
आमिर खान झाला इमोशनल
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नासोहळ्या दरम्यान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा रुमालाने अश्रू पुसताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयरा आणि नुपूर हे एकमेकांना रिंग घालत आहेत. त्याच वेळी आमिर खान हा नुपूर आणि आयरा यांना पाहून भावूक झाला आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नासोहळ्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा, जुनैद, नुपूर, नुपूरची आई, आमिर, रीना हे सर्वजण स्टेजवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हे सर्व जण भावूक झालेले देखील दिसत आहेत.
नुपूर आणि आयरानं केला डान्स
आयरानं पांढऱ्या रंगाचा गाऊन हेअर बन आणि व्हाईट शूज असा लूक लग्नसोहळ्यासाठी केला होता. तर नुपूरने टक्सिडो घातला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमध्ये नुपूर आणि आयरा हे एकमेकांच्या हातात हात घालून डान्स करताना दिसत आहेत.
13 जानेवारीला आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये आमिर खानने बॉलिवूडमधील सर्व बड्या स्टार्सना आमंत्रित केले आहे. आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीला शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत सर्वजण हजेरी लावणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या: