Shah Rukh Khan on Aryan Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. डंकीआधी त्याचे 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) हे सिनेमे रिलीज झाले. किंग खानने 2023 हे वर्ष गाजवलं होतं. आता त्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'पठाण' रिलीज होण्याआधी शाहरुख त्याचा लाडका लेक आर्यन खानमुळे (Aryan Khan) चर्चेत आला होता. आता ड्रग्जप्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खान शांत का राहिला याबद्दल त्याने भाष्य केलं आहे.
शाहरुख खान 2018 नंतर त्याच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होता. शाहरुखचा मुलगा आर्यनला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणामुळे तुरुंगात जावं लागलं होतं. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने त्याला आयुष्यात आलेल्या अडचणींवर भाष्य केलं आहे.
शाहरुख खान म्हणाला,"गेले चार-पाच वर्षे माझ्या कुटुंबियांसाठी आणि माझ्यासाठी रोलर-कोस्टर राईडसारखे होते. कोरोनाकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी माझे अनेक सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यानंतर माझं करिअर संपलं असल्याच्याही बातम्यांना सुरुवात झाली".
आयुष्यात अडचणी येतात, आशा सोडू नका : शाहरुख खान
शाहरुख पुढे म्हणाला,"वैयक्तिक आयुष्यातदेखील मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण या प्रवासात मला अनेक गोष्टी शिकता आल्या. एखाद्या समस्येवर मात करताना शांत राहायला हवं, असं मला वाटतं. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. पण आशा सोडली नाही पाहिजे".
शाहरुखच्या 'डंकी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका (Dunki Box Office Collection)
शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. रिलीजच्या 21 दिवसांत या सिनेमाने 220.72 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात शाहरुखसह विकी कौशल आणि तापसी पन्नू हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'डंकी' ओटीटी रिलीज (Dunki OTT Release)
शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दोन महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. जिओ सिनेमावर हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. 155 कोटींमध्ये जिओ सिनेमाने या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतले असल्याचं म्हटलं जात आहे. आता आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' ही सीरिज किंग खानच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या