Ira Khan And Nupur Shikhare Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir khan) मुलगी आयरा खाननं (Ira Khan)  काल (3 जानेवारी)  नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केलं. आयरा आणि नुपूर यांनी काल रजिस्टर मॅरेज केलं आहे. त्यांच्या या रजिस्टर मॅरेजला त्यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. आता आयरा आणि नुपूर यांच्या  रजिस्टर मॅरेजचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमधील नुपूरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेकजण नुपूरला त्याच्या लूकमुळे ट्रोल देखील करत आहेत. अशातच आता  आयरा आणि नुपूर यांच्या रजिस्टर मॅरेजमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा नुपूरला आंघोळ करायला सांगत आहे, असं दिसत आहे.


नुपूर लूकमुळे झाला ट्रोल (Ira Khan And Nupur Shikhare Wedding)


आमिर खानचा होणारा जावई  टी-शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये लग्नाच्या वरातीत सामील झाला आहे. तो वेडिंग वेन्यूपर्यंत जॉगिंग करत आला. त्यानंतर तो त्याच लूकमध्ये स्टेजवर गेला आणि त्यानं रजिस्टर मॅरेजच्या पेपर्सवर सही केली.नुपूरला त्याच्या या लूकमुळे अनेकांनी ट्रोल केलं. लग्नात असा लूक का केला आहे? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला. 


आयरा नुपूरला म्हणाली, "आंघोळ करुन ये"


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आयराच्या हातात माईक दिसत आहे. रिना दत्ता, आमिर खान आणि आझाद देखील स्टेजवर दिसत आहेत. यावेळी आयरा नुपूरला म्हणते, 'नुपूर आता आंघोळ करणार आहे.' यानंतर आयराही हसत हसत नुपूरचा बाय म्हणते.


पाहा व्हिडीओ:






नुपूर हा शॉर्ट, ब्लॅक टीशर्ट आणि स्पॉर्ट्स शूज अशा लूकमध्ये धावत वेडिंग वेन्यू पर्यंत पोहोचला .  वेडिंग वेन्यूच्या गेटवर नुपूरनं त्याच्या कुटुंबासोबत देखील डान्स केला. जवळपास 10 मिनिटे नुपूर त्याच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमंडळींसोबत डान्स करताना दिसला.






नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. तो वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.  आयरा आणि नुपूर 2020 पासून एकमेकांना डेट करत होते. 


महत्वाच्या बातम्या : 


Ira Khan Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात; मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करत बांधली लग्नगाठ