Ananya Pandey On Virat Kohli: आयपीएलची (IPL 2023) क्रेझ संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आयपीएलची मॅच पाहण्यासाठी जात आहेत. काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आयपीएलमधील आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Pandey) एका मुलाखतीमध्ये 'यंदा आयपीएलमध्ये कोणता खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणार?' या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
एका मुलाखतीमध्ये अनन्यानं सांगितलं की, यंदा आयपीएलमध्ये क्रिकेटर विराट कोहली हा ऑरेंज कॅप जिंकले.' आयपीएल 2023 मध्ये विराट हा फॉर्ममध्ये दिसत आहे. सध्या या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश आहे. आयपीएलच्या या सिझनमध्ये कोहलीनं एकूण चार अर्धशतक केले आहेत.
आयपीएल 2016 मध्ये विराटनं जिंकली होती ऑरेंज कॅप
IPL 2016 मध्ये विराट कोहलीने पहिल्यांदा ऑरेंज कॅप जिंकली. त्याच सिझनमध्ये विराट कोहलीनं एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला होता. आता आयपीएल 2023 मध्ये विराट हा ऑरेंज कॅप जिंकेल आणि अनन्या पांडेची भविष्यवाणी खरी ठरेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
विराट कोहलीने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 231 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 222 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 36.52 च्या सरासरीने आणि 129.61 च्या स्ट्राइक रेटने एकूण 6903 रन्स केल्या. यादरम्यान त्यानं एकूण 5 शतके आणि 48 अर्धशतके केली आहेत.
अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून काही नेटकरी अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य आणि अनन्या यांनी लॅकमे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. अनन्याचा लवकरच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अनन्याचा गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या: