Chrisann Pereira: सडक 2 चित्रपटातील अभिनेत्री क्रिसॅन परेराची  (Chrisann Pereira)   आज तुरुंगातून सुटका झाली आहे.   क्रिसॅन परेरा ही (Chrisann Pereira) गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे.  क्रिसॅनला ड्रग्ज प्रकरणी शारजाह तुरुंगात ठेवण्यात आले होते.  क्रिसन परेराची बुधवारी (26 एप्रिल) संध्याकाळी शारजाह तुरुंगातून सुटका करण्यात आली.  48 तासांत ती भारतात परत येऊ शकते. मुंबई गुन्हे शाखेने  क्रिसॅनला ड्रग प्रकरणात अडकवणाऱ्या आरोपी अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांना अटक केलं असून ते 2 मे पोलीस कोठडीत आहेत. 


क्रिसॅनच्या भावानं शेअर केली खास पोस्ट



क्रिसॅन परेराची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तिचा भाऊ केविननं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. केविन हा क्रिसॅनच्या सुटकेसाठी लॉबिंग करत होता. त्याने क्रिसॅनच्या सुटकेनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो क्रिसॅनसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये क्रिसॅनची आई देखील दिसत आहे. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं,  "क्रिसन सेटफ्री झाली आहे,पुढील 48 तासांत ती भारतात असेल "   


भूलथापा देऊन शारजाला पाठवून सोबत अमली पदार्थ देऊन क्रिसॅन परेरालाला अडकवल्याचा आरोप अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांच्यावर करण्यात आला  आहे. पूर्व वैमनस्यातून क्रिसॅन आणि डी जे क्लेटन रॉड्रिग्जला अडकवल्याचा संशय आहे.  पोलीस या प्रकरणाचा पुढे तपास करत आहेत. 






 


अभिनेत्री  क्रिसॅन परेराला ऑडिशनसाठी शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पाठवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी  तिला एक ट्रॉफी देण्यात आली. या ट्रफीमध्ये ड्रग्स होते. तिला सांगण्यात आले की ही ट्रॉफी ऑडिशन प्रॉपचा भाग आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आणि नंतर शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले की, पॉल हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे .



क्रिसॅन परेरा हिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटासोबतच तिनं बाटला हाऊस या चित्रपटात देखील काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटामध्ये क्रिसॅन परेरा बरोबरच  पूजा भट्ट, आलिया भट्ट,  संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांनी देखील काम केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chrisann Pereira: सडक 2 मधील अभिनेत्रीला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा आरोप; अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे कोर्टात हजर, 2 मे पर्यंत पोलीस कोठडी