Virat Kohli Anushka Sharma Dance Video: सध्या देशभरात आयपीएलची (Indian Premier League) क्रेझ पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (Royal Challengers Bangalore) या संघानं आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. पण सध्या विराट कोहली हा  क्रिकेटमुळे नाही तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का हे  एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 


अनुष्कानं एका जिममधील व्हिडीओ शेअर केला आहे. या जिममध्ये विराट आणि अनुष्का एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतात. त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी अचानक विराट ओरडतो. डान्स कराताना विराटच्या पायाला दुखापत होते. ते पाहून अनुष्का हसायला लागते. विरुष्काच्या या क्युट व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 


नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 


अनुष्कानं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'भावा, नीट डान्स कर तुला दुखापत झाली तर आरसीबीचं काय होईल.' तर दुसऱ्या युझरनं क्युट.' अशी कमेंट केली.  अनुष्कानं शेअर केलेल्या या व्हिडीओला 7 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक मिलियपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं असून 17 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.


पाहा व्हिडीओ: 






अनुष्का ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनुष्काला इन्स्टाग्रामवर  63 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 


अनुष्काचे आगामी चित्रपट


2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला. अनुष्का आणि विराट एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.  गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता. अनुष्काचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अनुष्का ही बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Anushka Virat On Natu Natu: विराट कोहली थिरकला 'नाटू-नाटू' गाण्यावर; व्हिडीओ व्हायरल