आधी तांत्रिक अडचणींमुळं लांबणीवर पडलेली सुरूवात आणि मग पावसानं आणलेला व्यत्यय यामुळं या सामन्यात चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त केली. एरव्ही टीम इंडियाचा डॅशिंग माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर हटके ट्विट करताना दिसतो. मात्र काल अमिताभ बच्चन यांचंही तसंच ट्विट पाहायला मिळाले.
बिग बी यांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. "पावसाने भारत - वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी ट्वेण्टी सामना थांबवला. मात्र हा पाऊस नव्हे तर विंडिजच्या ढगांचे दु:खाचे अश्रू होते. ज्यांनी अक्षरश: रडून कबुली दिली की भारतच जिंकला", असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता या लढतीला सुरूवात होणं अपेक्षित होतं. पण आल्यानं प्रत्यक्षात तब्ब्ल चाळीस मिनिटं उशीरानं सामना सुरू झाला. तांत्रिक कारणांमुळं हा उशीर झाल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं. मग खेळ सुरू झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा डाव 19 षटकं आणि चार चेंडूंमध्ये 143 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर भारतानं दोन षटकांत बिनबाद पंधरा धावांची मजल मारली. त्यानंतर पाऊस कोसळू लागल्याने भारतीय संघाच्या मालिकेत बरोबरी साधण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या.