Omicron in India Latest Update : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाचं ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशात आत्तापर्यंत 3 हजार 71 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 1 हजार 203 जण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत, तर या नवीन व्हेरिएंटमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यनिहाय विचार केला तर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, त्यानंतर दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधीक रुग्ण आहेत.
 


ओमायक्रॉनची देशातील स्थिती


एकूण रुग्ण 3 हजार 71
ओमायक्रॉनमधून बरे झालेले - 1 हजार 203
एकूण 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव
मृत्यू 2


 


कोणत्या राज्यात ओमायक्रॉनचे किती रुग्ण


महाराष्ट्र-  876, रिकवर 381
दिल्ली- 513, रिकवर  57
कर्नाटक- 333, रिकवर 26
राजस्थान-  291 रिकवर 159
केरळ-  204, रिकवर 151
गुजरात-  204, रिकवर 112
तेलंगाणा- 123, रिकवर 47
तामिळनाडू- 121, रिकवर 121
हरियाणा- 114, रिकवर 83
ओडीसा- 60, रिकवर 5
उत्तर प्रदेश- 31, रिकवर 6
आंध्र प्रदेश- 28, रिकवर 6
पश्चिम बंगाल- 27, रिकवर 10
गोवा- 19, रिकवर 19
आसाम -  9, रिकवर 9
मध्य प्रदेश-  9, रिकवर 9
उत्तराखंड-  8, रिकवर 5
मेघालय- 4, रिकवर 3
अंदमान निकोबार-  3, रिकवर 0
चंडीगढ- 3, रिकवर 3
जम्मू कश्मीर- 3, रिकवर 3
पुद्दुचेरी-  2, रिकवर 2
पंजाब-  2, रिकवर 2
हिमाचल प्रदेश- 1, रिकवर 1
लद्दाख-  1, रिकवर 1
मणिपूर- 1, रिकवर 1


या राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असून, ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना धोका कमी असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.


दरम्यान, देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 285 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आडेवारी जाहीर केली आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 4 लाख 83 हजार 463 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 नागरिक कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 4 लाख 72 हजार 169 झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: