OTT Releases in September : गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सिनेमे (Movies) प्रदर्शित होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुमारे 400 वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. या महिन्यात 'क्रिमिनल जस्टिस 3' पासून 'दिल्ली क्राईम 2' पर्यंत अनेक दर्जेदार वेबसीरिजने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर सप्टेंबर महिन्यातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.
जामताडा सीझन 2
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
कधी होणार प्रदर्शित? 23 सप्टेंबर
'जामताडा' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. थरार नाट्य असणारी ही वेबसीरिज प्रेक्षक 23 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
फैबुलस लाइव्स ऑफ बॉलिवुड वाइव्स सीझन 2
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
कधी होणार प्रदर्शित? 2 सप्टेंबर
'फैबुलस लाइव्स ऑफ बॉलिवुड वाइव्स' या नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन 2 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2020 मध्ये पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये नीलम कोठारी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडे महत्त्वाच्या भूमिकेत होते.
द लॉर्ड ऑफ द रिंग्स - द रिंग्स ऑफ पॉवर
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार प्रदर्शित? 2 सप्टेंबर
'द लॉर्ड ऑफ द रिंग्स'च्या आगामी 'द रिंग्स ऑफ पॉवर' या वेबसीरिजची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. 2 सप्टेंबरपासून ही वेबसीरिज प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
द एंडोर 2
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार प्रदर्शित? 21 सप्टेंबर
'द एंडोर' ही हॉलिवूडची वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. थरार असणार ही वेबसीरिज 21 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या