OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना 'जादूगर', 'जनहित में जारीसह' अनेक सिनेमे पाहायला मिळणार आहेत.
कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईटकधी होणार प्रदर्शित? 14 जुलैकुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
'कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईट' या वेबसीरिजचा पहिला सीझन14 जुलैपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये अॅनिमेशन मार्शल आर्ट्स आहे.
जादूगरकधी होणार प्रदर्शित? 15 जुलैकुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
पंचायत फेम जितेंद्र कुमारचा 'जादूगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात जितेंद्र मीनू नावाचे पात्र साकारत आहे.
जनहित में जारीकधी होणार प्रदर्शित? 15 जुलैकुठे होणार प्रदर्शित? झी 5
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'जनहित में जारी' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 15 जुलैपासून हा सिनेमा प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे.
शूरवीरकधी होणार प्रदर्शित? 15 जुलैकुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
'शूरवीर' ही वेबसीरिज 15 जुलैपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या