Liger box office collection day 3 : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) याच्या लायगर (Liger) या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. जाणून घ्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
लायगरचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
रमेश बाला यांनी एका ट्वीट शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये रमेश बाला यांनी लायगर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली. शनिवारी या चित्रपटानं जवळपास 4.10 ते 4.50 कोटींची कमाई केली. लायगर या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 33.12 कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत जवळपास 50 टक्के घसरण झाली. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 16 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. आता रविवारी या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस किती झालं? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल.
लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी रिलीज झाली. या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. लायगर या चित्रपटात राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. रोनित रॉय, रम्या कृष्णन आणि माईक टायसन या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन’ माईक टायसनचा ‘लायगर’ चित्रपटामधील कॅमिओ देखील चर्चेत आला आहे.
लायगरचा पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली. समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: