IIFA Awards 2023 : 'आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' सोहळ्याला (International Indian Film Awards) आजपासून सुरुवात होणार आहे. 2000 साली सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याची क्रेझ बॉलिवूडकरांमध्ये आजही कायम आहे. यंदाच्या 23 व्या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


'आयफा 2023' (IIFA 2023) पुरस्कार सोहळा सिने तारे तारकांच्या उपस्थितीत अबुधाबीमध्ये पार पडणार आहे. अबुधाबीमधील एका बेटावर या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 आणि 27 मे दरम्यान हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 


'आयफा 2023' कोण होस्ट करणार? 


'आयफा 2023' बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) होस्ट करणार आहेत. अभिषेक आणि विकी दोघेही कमाल आहेत. त्यामुळे 'आयफा 2023' खूपच मनोरंजनात्मक होणार आहे. 


'आयफा 2023'मध्ये कोण कोण परफॉर्म करणार? 


'आयफा पुरस्कार 2023'मध्ये सलमान खान, कृती सेनन, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडीस, नोरा फतेही आणि रकुल प्रीत सिंह परफॉर्म करणार आहेत. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. आपल्या सादरीकरणाने सेलिब्रिटी चाहत्यांना वेड लावणार आहेत. 






आयफाचं 22 वं वर्ष खूपच खास होतं. सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी त्यावेळी होस्ट केलं होतं. पण यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडकरांसोबत जगभरातील अनेक नामांकित कलाकारदेखील हजेरी लावणार आहेत. आता दोन वर्षांनी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. सोशल मीडियावर 'आयफा 2023' संदर्भातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 


'आयफा 2023' हा पुरस्कार सोहळा आधी फेब्रुवारी महिन्यात होणार होता. पण काही कारणाने हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला. अभिषेक बच्चन 'आयफा 2023' या पुरस्कार सोहळ्याबद्दल म्हणाला,"आयफा 2023'साठी मी खूप उत्सुक आहे. आयफा माझ्यासाठी कौटुंबिक पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यासोबत मी जोडलो गेलो आहे". 


'आयफा 2023' नामांकनाची यादी जाणून घ्या...


सर्वोत्कृष्ट चित्रपट 
- भूल भुलैया 2
- डार्लिंग्स
- दृश्यम 2
- गंगूबाई काठियावाडी
- विक्रम वेधा


संबंधित बातम्या


IIFA 2023 : ठरलं; 'या' दिवशी पार पडणार 'आयफा 2023'; सिने तारे तारकांच्या उपस्थितीत पार पडणार दिमाखदार पुरस्कार सोहळा