एक्स्प्लोर

...तर करणी सेनेला उद्ध्वस्त करेन : कंगना रनौत

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेनं विरोध केला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो दाखवण्यात यावा, अशी मागणी करणी सेनेनं केली आहे. मणिकर्णिका या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगना रानौतने करणी सेनेची मागणी धुडकावून लावली आहे. तिने आपण राजपूत असल्याचा दाखला दिला आहे.

मुंबई : करणी सेनेनं त्रास द्यायचं थांबवलं नाही तर मी पण राजपूत आहे सर्वांना उद्ध्वस्त करेन, असा इशारा अभिनेत्री कंगना रनौतने दिला आहे. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेनं विरोध केला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तो दाखवण्यात यावा, अशी मागणी करणी सेनेनं केली आहे. मणिकर्णिका या सिनेमात राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगना रानौतने करणी सेनेची मागणी धुडकावून लावली आहे. तिने आपण राजपूत असल्याचा दाखला दिला आहे. 'मणिकर्णिका  : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा चार इतिहासकारांनी प्रमाणित केल्याची माहिती कंगनाने दिली आहे. सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. शिवाय करणी सेनेलाही कळवण्यात आलं होतं. तरीही करणी सेनेनं मला  किंवा या सिनेमाशी संबंधित कोणालाही त्रास देणं थांबवलं नाही, तर मी एकेकांना उद्ध्वस्त करेन, असा इशारा कंगना रनौत यांनी दिला आहे. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या सिनेमाचं गाणं लिहलं आहे. शिवाय या सिनेमातून देश प्रेम व्यक्त करा असा मेसेज देण्यात आला आहे असं प्रसून जोशी म्हणाले आहे. कंगनाने अशी माहिती दिली. या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत संबंध दाखवण्यात आल्याच्या काही बातम्या आल्यानंतर करणी सेनेनं या सिनेमाला विरोध सुरु केला आहे. रिलीज करण्यापूर्वी चित्रपट करणी सेनेला दाखवण्यात यावा, अन्यथा हा सिनेमा चित्रपटगृहात चालू देणार नाही अशी भूमिका करणी सेनेनं घेतली आहे. सिनेमा रिलीज करु नका म्हणून या सेनेनं मणिकर्णिकाच्या निर्मात्यांच्या ऑफिससमोरही निदर्शनं केली. यापूर्वीही 2017 मध्ये करणी सेनेनं पद्मावत चित्रपटला विरोध केला होता. चुकीच्या पद्धतीने राणी पद्मावती यांना या चित्रपटात दाखवण्यात आलं असल्याचा ठपका ठेवत करणी सेनेनं देशभरात या चित्रपटाला विरोध केला होता. सोबत दीपिका पदुकोणची नाक कापण्याची धमकी सुद्धा दिली होती. आता तिच करणी सेना कंगना रनौतच्या मणिकर्णिका चित्रपटाला विरोध करत आहे. मात्र कंगनाने करणी सेनेला सडेतोड उत्तर देण्याचं ठरवलं आहे. 25 जानेवारीला होणार रिलीज कंगनाने या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. या सिनेमात कंगनासह अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्जोंगपा, सुरेश ओबेरॉय यांसारखे कलाकार दिसणार आहे. 25 जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये स्पेशल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget