जन्मदिनानिमित्त अनेक टीव्ही चॅनेल्सवर शनिवारी अमरीश पुरी यांचे सर्वोत्तम चित्रपट पाहायला मिळाले. पुरी यांनी कित्येक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करुन चाहत्यांनी खूश केले आहे. पुरी यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत 'मिस्टर इंडिया' चित्रपट पहिल्या दहामध्ये आहे.
मिस्टर इंडिया चित्रपटात अमरीश पुरी यांनी साकरलेली 'मोगॅम्बो'ची भूमिका खूप गाजली. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी असा दावा केला आहे की, अमरीश पुरी हे या भूमिकेसाठी दिग्दर्शक शेखर कपूर यांची पहिली पसंती नव्हते. खेर म्हणाले की, "दिग्दर्शक शेखर कपूर यांची इच्छा होती की, 'मोगॅम्बो'ची भूमिका मी करावी."
खेर म्हणाले की, दिग्दर्शकाने मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी मला विचारणा केली होती. परंतु एक-दोन महिन्यांनंतर निर्मात्यांनी माझ्या जागी अमरीश पुरी यांना मोगॅम्बोची भूमिका दिली. मला या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं.
खेर म्हणाले की, एखाद्या अभिनेत्याला कोणत्याही चित्रपटातून काढून टाकलं, तर त्याला वाईट वाटतं. परंतु जेव्हा मी मिस्टर इंडिया चित्रपट पाहिला. अमरीश पुरी यांना मोगॅम्बोच्या भूमिकेत पाहिले. तेव्हा मला समजलं की, निर्मात्यांनी या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांची निवड केली, हा योग्य निर्णय होता.
वाचा : मराठीतून एन्ट्री ते यशाचं शिखर, अमरीश पुरींचा सिनेप्रवास
अमरीश पुरींच्या 15 सुपरहिट भूमिका
लवेबल विलन- अमरीश पुरी
इथे सैनिकांवरही हल्ले होतात, अजून किती स्वातंत्र्य हवं : अनुपम खेर