Hrithik Roshan About Salman Khan : बॉलिवूडचा ग्रीक गॉड ह्रतिक रोशन टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. सुपरस्टार ह्रतिक रोशनला पहिल्याच चित्रपटापासून स्टारडम मिळाला. राकेश रोशन यांच्या 'कहो ना प्यार हैं' चित्रपटातून ह्रतिक रोशनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाआधी  ह्रतिक खूप टेन्शनमध्ये होता. डेब्यू चित्रपटासाठी ह्रतिक वर्षभर मेहनत घेत होता, पण त्याच्या मेहनतीला यश मिळत नव्हतं. यानंतर त्याने बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानची मदत घेतली होती. ह्रतिक रोशन एका जुन्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.


पहिल्या चित्रपटाआधी चिंतेत होता ह्रतिक रोशन


ह्रतिक रोशन याला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 24 वर्षे झाली आहे. हँडसम लूक आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. 'कहो ना प्यार हैं' ह्रतिकने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला, या चित्रपटामुळे तो स्टार बनला. या चित्रपटाचं शूटींग सुरु करण्याआधी ह्रतिक रोशन एक वर्ष खूप चिंतेत होता, यानंतर त्याने सलमान खानची मदत घेतली होती. 


वर्षभर मेहनत करुनही हाती निराशा


हृतिक रोशनचा डान्स असो किंवा त्याचा अभिनय, या अभिनेत्याची फक्त एक झलक चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेशी आहे. हृतिक रोशनने 2000 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी  वडील राकेश रोशन दिग्दर्शित 'कहो ना प्यार है' या रोमँटिक चित्रपटाने करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली. पहिल्याच चित्रपटात हृतिकने आपल्या लूक, डान्स आणि अभिनयाने सर्वांना वेड लावलं. 


पदार्पणाआधी वर्षभर चिंतेत होता हृतिक रोशन


फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी  हृतिक रोशन खूप चिंतेत होता. त्याला मोठ्या पडद्यावर डॅशिंग आणि फिट दिसण्याची इच्छा होती. बीबीसीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत हृतिक रोशनने सांगितलं होतं की, 'कहो ना प्यार हैं' चित्रपटासाठी त्याने मेडिटेशन केले. गायन आणि अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्याला चित्रटातील त्याच्या रोहित आणि राज या डबल रोलमध्ये परफेक्ट दिसायचं होतं. पण, त्याला रोहित आणि राजचा लूक पूर्णपणे वेगळा हवा होता. 


बॉलिवूड डेब्यूवेळी सलमान खानची ह्रतिक रोशनला मदत


अभिनेता हृतिक रोशन म्हणाला, "शारीरिकदृष्ट्या चांगले दिसणं खूप महत्वाचं आहे, हे मला माहित आहे. विशेषत: ज्या चित्रपटात माझा डबल रोल आहे, तिथे हे महत्त्वाचं ठरते. चित्रपटाच्या पहिल्या भागात मी रोहित आणि नंतरच्या भागात राजच्या भूमिकेत होतो. मला वाटलं की जर दोघांचे लूक माझ्या भूमिकेप्रमाणेत वेगळे असतील, ते तर छान वाटेल. म्हणून मी एक वर्ष ट्रेनिंग घेतली, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यानंतर मी बॉडी बिल्डिंगसाठी सलमान खानकडून टीप्स घेतल्या".


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ratan Tata Death : असा माणूस पुन्हा होणे नाही, तुमचा वारसा पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून रतन टाटा यांना मानवंदना