Sussanne Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) एक्स वाईफ सुझान खान (Sussanne Khan) ही अनेकदा तिचा बॉयफ्रेंड अरसलान गोनीसोबत स्पॉट होते. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आणि वेकेशन एन्जॉय करण्यासाठी   सुझान  आणि अरसलान हे मुंबईच्याबाहेर जाण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचले. पण यादरम्यान असे काही घडले की, सुझान आणि अरसलान यांना परत घरी परतावे लागले.  सुझान  आणि  अरसलान हे एअरपोर्टवरुनच घरी का परतले? जाणून घेऊयात...


सुझान  आणि  अरसलान एअरपोर्टवरुनच घरी का परतले?


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि वेकेशन एन्जॉय करण्यासाठी  सुझान आणि अरसलान हे मुंबईबाहेर जाण्यासाठी  शनिवारी सकाळी विमानतळावर पोहोचले. त्यांचे एअरपोर्टवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये सुझान खान आणि अरसलान गोनी हे एअरपोर्टच्या गेटवर  कागदपत्रे  दाखवताना दिसले. सुझानकडे तिची सर्व कागदपत्रे आहेत पण अरसलान कदाचित त्याचा पासपोर्ट घरी विसरला आहे. त्यामुळे  अरसलानकडे पासपोर्ट नसल्याने दोघेही माघारी परतले.  सुझान आणि अरसलान यांचे मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


सुझान आणि अरसलान  यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विमानतळावरील व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "तुम्हाला कुठेतरी जायचं होतं की फक्त फोटो क्लिक करून घेण्यासाठी विमानतळावर आले होते." तर दुसऱ्या युझरनं कमेंटमध्ये लिहिलं,  "एवढा निष्काळजीपणा?"


पाहा व्हिडीओ:






 हृतिक रोशननं सुझान खानसोबत 2000 मध्ये लग्नगाठ बांधली. पण या जोडप्याने 2014 मध्ये घटस्फोट घेतला. सुझान आणि हृतिक रोशन यांना दोन मुले आहेत.  सुझान गेल्या काही वर्षांपासून अरसलान गोनीला डेट करत आहे, तर हृतिक रोशन हा काही महिन्यांपासून अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला डेट करत आहे.  हृतिक आणि सुझान यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.काही दिवसांपूर्वी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Sussanne Khan : सुझान खान लवकरच बॉयफ्रेंड अरसलान गोनीसोबत अडकणार लग्नबंधनात