Sussanne Arslan Wedding : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खानने (Sussanne Khan) घटस्फोट घेतला असला तरी त्यांची अजूनही मैत्री आहे. हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सुझान अरसलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे. तर दुसरीकडे हृतिक आणि सबा लग्न करणार अशा चर्चा होत आहेत. अशातच सुझान अरसलान गोनीसोबत (Arslan Goni) लग्नबंधनाच अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. 


सुझानच्या घरी लगीनघाई


सुझान खान आणि अरसलान गोनी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. अशातच सुझान आणि अरसलान लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कमीत-कमी मंडळींच्या उपस्थितीत सुझान आणि अरसलानचा लग्नसोहळा पार पडला आहे. दोघांच्या घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.


बॉलिवूड लाइफच्या एका सूत्राने म्हटले आहे, सुझान आणि अरसलानला त्यांच्या आयुष्यासंबंधी योग्य निर्णय घेत आहे. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. सुझानने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुझान आणि अरसलान साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. कोणत्याही प्रकारचं ग्रॅंड सेलिब्रेशन करण्यात येणार नाही". 






हृतिक-सबा अडकणार लग्नबंधनात?


हृतिक-सबाच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. दोघे लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही. हृतिक रोशन आणि सुझान खान 20 डिसेंबर 2000 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 2014 साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना रेहान आणि रिदान ही दोन मुलं आहेत. दोघेही मुलांची काळजी घेताना दिसून येतात. 


संबंधित बातम्या


Sussanne Khan, Hrithik Roshan : ‘तू सुपरस्टार आहेस’, हृतिक रोशनने केलं ‘एक्स-वाईफ’ सुझान खानचं कौतुक!


Sussanne Khan, Hrithik Roshan : हृतिक-सुझानच्या लेकाला अर्सलान गोनीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, ‘बर्थडे’ पोस्टवर कमेंट करत म्हणाला...