एक्स्प्लोर

नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!

24 फेब्रुवारीला जेव्हा श्रीदेवींचा मृत्यू झाला त्यावेळी बोनी कपूर तिच्या रुममध्ये नव्हता. श्रीदेवी यांना सर्वात आधी हॉटेलमधील स्टाफने बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. असा दावा पिंकविलाने डॉट कॉमने केला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नवनवे दावे आता समोर येत आहेत. याप्रकरणी आता बॉलिवूड वेबसाइट पिंकविला डॉट कॉमने नवा दावा केला आहे. 24 फेब्रुवारीला जेव्हा श्रीदेवींचा मृत्यू झाला त्यावेळी बोनी कपूर त्यांच्या रुममध्ये नव्हता. श्रीदेवी यांना सर्वात आधी हॉटेलमधील स्टाफने बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. असा दावा पिंकविलाने डॉट कॉमने केला. 24 फेब्रुवारीला हॉटेल स्टाफने श्रीदेवीच्या रुमची बराच वेळा बेल वाजवली. पण आतून कुणाचंच उत्तर येत नव्हतं. त्यामुळे हॉटेल स्टाफने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी श्रीदेवी बाथरुम फ्लोअरवर पडलेल्या दिसून आल्या. त्यावेळी साधारण रात्रीचे अकरा वाजले होते. हॉटेल स्टाफने तात्काळ श्रीदेवींना जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, याआधी यूएईमधील वृत्तपत्र खलीज टाइम्सने असा दावा केला होता की, 'शनिवारी रात्री बोनी कपूर मुंबईहून दुबईला आले. त्यानंतर ते श्रीदेवींना सरप्राईज डिनरवर घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांनी युएईतील जुमैरा एमीरैट्स टॉवर्स हॉटेलमधील रुममध्ये जाऊन श्रीदेवींना उठवलं आणि 15 मिनिटं बातचीत केली. त्यावेळी बोनी कपूर यांनी आपल्या पत्नीला डिनरसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर श्रीदेवी तयार होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या.' '15 मिनिटं होऊन गेली तरी श्रीदेवी बाहेर आल्या नाही. त्यामुळे बोनी कपूर यांनी वॉशरुमचा दरवाजा ठोठावला. पण तरीही श्रीदेवी यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे बोनी कपूर यांनी जोराचा धक्का देत वॉशरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना श्रीदेवी बाथटबमध्ये पडलेल्या आढळून आल्या.' असं खलीज टाइम्समध्ये म्हटलं आहे. 'श्रीदेवी यांना त्या अवस्थेत पाहून बोनी कपूर यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीदेवी काही केल्या शुद्धीत येत नव्हत्या. त्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोवर श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.' अशी माहिती खलीज टाइम्सने दिली आहे. संबंधित बातम्या : श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर 'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Embed widget