Shweta Tiwari Controversy : 26 जानेवारी रोजी भोपाळमध्ये, आपल्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त विधानानंतर श्वेता तिवारीने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.


मात्र, आता ती पत्रकार परिषद घेणारे सुप्रसिद्ध होस्ट सलील आचार्य (Salil Acharya) यांनी एबीपी न्यूजशी बोलताना या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. श्वेता तिवारी यांनी ते विधान कोणत्या संदर्भात केले होते, हे देखील सांगितले.


अर्थाचा विपर्यास झाला!


सध्या गोव्यात असलेले सलील आचार्य यांनी एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले की, ‘खरं तर मी शोमध्ये ब्रा फिटरची भूमिका करणारा अभिनेता सौरभ राज जैन याला स्टेजवर एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी सौरभला विचारले की, अनेक पौराणिक शोमध्ये देवापासून ते ब्रा फिटरची भूमिका साकारण्यापर्यंत, तो वेगवेगळ्या पात्रांची निवड कशी करतो? या प्रश्नावर सौरभ राज जैन काही बोलण्याआधी श्वेता तिवारी गमतीने म्हणाली की, कल्पना करा, देव माझ्या ब्राचे मोजमाप करत आहे.’ हे संपूर्ण संभाषण चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असून, श्वेताचा असे म्हणण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे सलील यांचे म्हणणे आहे.


गुन्हा दाखल


श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. या वादामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारीविरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha