Shweta Tiwari Controversy : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीनं (Shweta Tiwari) भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे.  एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. फॅशन जगताशी संबंधित असलेल्या या वेब सीरिज बाबत सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वक्तव्य केलं. यावेळी या सीरिजची संपूर्ण टीम उपस्थित होती. श्वेतानं केलेल्या अंतर्वस्त्रांबाबत वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आता या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


रिपोर्टनुसार,  मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा  म्हणाले की, 'श्वेता तिवारी यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून  24 तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ही गोष्ट  सहन केली जाणार नाही. '
 
भोपाळ येथे सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत केलेलं  वक्तव्य हे तिनं गमतीत केलं असलं तरी या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या आधी देखील श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. श्वेता आणि अभिनव कोहली यांच्यामधील वादांमुळे श्वेता चर्चेत होती. 


कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता विजेती स्पर्धक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha