Hollywood Strike : हॉलिवूडकर सध्या संपावर (Hollywood Strike)  आहेत. हॉलिवूडचे लेखक गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असून आता यात कलाकारांचादेखील समावेश झाला आहे. गेल्या 63 वर्षांत पहिल्यांदाच हॉलिवूडमध्ये संप होत आहेत. संपूर्ण हॉलिवूडचा या संपात समावेश आहेत. 


कमी मानधन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजिन्समुळे उद्धभवलेल्या धोक्यामुळे हॉलिवूडमधील लेखकांनी दोन महिन्यांपूर्वी संप केला होता. अभिनेता गिल्डसह 1,60,000 कलाकारांचा या संपात समावेश आहे. हॉलिवूडकर मोठ्या प्रमाणात संपात सहभागी होत असल्याने शूटिंगदेखील थांबलं आहे. 


टॉम क्रूझ, जॉनी डेपसह अनेक कलाकार संपावर


हॉलिवूडच्या संपामुळे 'स्ट्रेंजर थिंग्ज', 'द हँडमेड्स टेल' अशा लोकप्रिय मालिकांचं शूटिंग थांबलं आहे. हा संप असाच सुरू राहिला तर अनेक हॉलिवूडपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येऊ शकते. टॉम क्रूझ (Tom Cruise), अँजेलिना जोली,  जॉनी डेप (Johnny Depp), मेरिल स्ट्रीप, बेन स्टिलर आणि कॉलिन फॅरेल असे लोकप्रिय हॉलिवूडचे कलाकार या संपात सहभागी झाले आहेत. 


"एसएजी-एएफटीआरए नॅशनल बोर्डाने स्टुडिओ आणि स्ट्रीमर्सच्या विरोधात संप जारी करण्यासाठी एकमताने मतदान केले," असे युनियनचे मुख्य निगोशिएटर डंकन क्रॅबट्री-आयरलँड यांनी सांगितले. गुरुवारी मध्यरात्री संपाला सुरुवात झाली आहे. 1960 नंतर पहिल्यांदाच हॉलीवूडमध्ये एवढा मोठा संप होत आहे. 






हॉलिवूडचे लेखक गेल्या काही दिवसांपासून संपावर आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजिन्सचा हॉलिवूडकरांना मोठा फटका बसू शकतो. दरम्यान त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी संप सुरू केला आहे. अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. हॉलिवूडमध्ये चांगल्या दर्जाच्या सिनेमांची निर्मिती होत असते. संप असाच सुरू राहिला तर मनोरंजनसृष्टीसाठी हे वर्ष धोक्याचं ठरू शकतं. 






कलाकार का सहभागी झाले? 


वॉल्ट डिज्ने कंपनी आणि नेटफ्लिक्स स्टुडिओचे प्रतिनिधित् करणाऱ्या अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अॅन्ड टेलिव्हिजनच्या निर्मात्यांबरोबर कामगार युनियनचे नवीन लेबर अॅग्रीमेंट होऊ शकले नाही त्यानंतर अभिनेता गिल्डसह 1,60,000 हजार कलाकार या संपात सहभागी झाले आहेत. 


संबंधित बातम्या


Mission Impossible 7 Box Office Collection : टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल'चा आकडा घसरला; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...