Mission Impossible 7 Box Office Collection Day 2 : हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझचा (Tom Cruise) 'मिशन : इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' (Mission Impossible Dead Reckoning Part One) अर्थात 'मिशन इम्पॉसिबल 7' (Mission Impossible 7) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 21.30 कोटींची कमाई केली आहे. 


'मिशन इम्पॉसिबल 7'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Mission Impossible Box Office Collection)


'मिशन इम्पॉसिबल 7' (Mission Impossible Movie) या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता होती. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी (Mission Impossible 7 Box Office Collection) भारतात या सिनेमाने 12.30 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने फक्त 9 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत या सिनेमाने आतापर्यंत 21.30 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीचा आकडा घसरलेला दिसून आला आहे. 






'मिशन इम्पॉसिबल 7' या सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा होती. त्यामुळे रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 'मिशन इम्पॉसिबल' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे. टॉम क्रूझचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 


'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट टू' कधी रिलीज होणार? (Mission Impossible Dead Reckoning Part Two)


ख्रिस्टोफर मॅक्वेलने (Christopher Mcquarrie) 'मिशन इम्पॉसिबल 7' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून टॉम आणि ख्रिस्टोफर यांनी तिसऱ्यांदा एकत्र काम केलं आहे. ख्रिस्टोफर आणि एरिक जेन्डरसनने या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट टू' पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 
   
'मिशन इम्पॉसिबल 7'ने (Mission Impossible 7) रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 131 कोटींची कमाई केली आहे. 2023 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. 'मिशन इम्पॉसिबल 7' या सिनेमात टॉमसह (Tom Cruise) हेले एटवेल (HAYLEY ATWELL), पोम क्लेमेंटिएफ, विंग रेम्स, साइमन पेग, रेबेका फर्ग्यूसन, वैनेसा किर्बी आणि हेनरी कजर्नी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Mission Impossible Review : 61 वर्षीय टॉम क्रूझसाठी अवश्य पाहावा असा 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन'