Bollywood Actress : अभिनेत्री हिना खान (Hina Khan) टीव्ही विश्वातील लोकप्रिय नाव आहे.  'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत हिना खान अक्षराच्या भूमिकेत होती. अनेक दिवस ती या मालिकेचा भाग होती. पण एक दिवस अचानक तिने मालिकेला रामराम केल्याचं वृत्त समोर आलं आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका चांगलीच गाजवली आहे. 'बिग बॉस'सारख्या (Bigg Boss) सारख्या मालिकेच्या माध्यमातून तिने छोटा पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 


अन् हिना खानला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला...


'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी नुकतचं एका मुलाखतीत म्हटलं की,"हिना खानने मालिका सोडली नव्हती तर तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता". हिना खानच्या जागेवर अभिनेत्री शिवांगी जोशीला (Shivangi Joshi) घेण्यात आले होते.  हिना खान आणि शिवांगी जोशी यांच्या वयात 11 वर्षांचं अंतर आहे. हिना खान 36 वर्षांची आहे. तर शिवांगी जोशी 25 वर्षांची आहे. 


घरातून पळालेली हिना खान


हिना खान घरातून पळून गेली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. DNA India च्या वृत्तानुसार, हिना खान म्हणाली होती,"मी बागेतील झाडांची पाने तोडली. एका प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये ती पाने तोडून गॅसवर ठेवली. प्लॅस्टिक वितळायला लागलं तसं मी पळून गेले. पुढे श्रीनगर पोलिसांनी मला शोधून काढलं. लहानपणी या गोष्टीमुळे मला ओरडा मिळाला. मी एका कोपऱ्यात बसले होते. त्या दिवसानंतर मी कधीही स्वयंपाक करायला गेले नाही. 


हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर ती 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss) सहभागी झाली. बिग बॉसच्या माध्यमातून हिना खानने आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली. हिना खान फॅशनिस्टा ठरली होती. नागिन सारख्या मालिकांमध्येही तिने काम केलं.


फिटनेसफ्रिक हिना खान... (Hina Khan Fitness Secret)


हिना खान वयाच्या 35 व्या वर्षीही फिट आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, हिना सकाळी नाश्त्यात दूध, ओट्स आणि कॉर्नफ्लिक्स या पदार्थांचं सेवन करते. दुपारच्या जेवणात दाळ, भाजी, चपाती आणि सॅलड खाते. तर रात्री पनीर किंवा चिकन आणि चपाती खाते. तसेच व्यायामाकडेदेखील तिचं लक्ष असतं. 


संबंधित बातम्या


Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर